BJS College


भारतीय जैन संघटना संचालित
प्राथमिक विद्यालय ,पिंपरी.

Shantilal

मुख्याध्यापक मनोगत

श्री संजय जाधव


पिंपरी चिचवड ओद्योगिक परिसरात मध्ये जून १९९४ पासून भारतीय जैन संघटना संचलित प्राथमिक विद्यालय सुरु आहे. संस्थापक अद्यक्ष माननीय शांतीलालजी मुथा यांचा संकल्पनेतून गोर गरीब व सर्वसामान्य मुलांना चांगले व गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळावे यासाठी या विद्यालयाची स्थापना करण्यात आली, आमच्याकडे ह्या प्राथमिक विद्यालयात विद्यार्थांचा सर्वांगीन व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शासकीय नियमानुसार विभाग करण्यात आले बालवाडीत छोटागट . मध्यम गट. मोठागट. असे तीन गट असून प्राथमिक विभागात १ ते ४ थी चे आठ वर्ग आहेत, बालवाडी विद्यार्थी संख्या १७१ व प्राथमिकची ४३६ असून दर वर्षाच्या नियोजना प्रमाणे आम्ही वर्षभर विविध कार्यक्रम , स्पर्धा व अभ्यासिका राबवतो.

आतापर्यंत शाळेला विविध स्पर्धामध्ये बक्षिस मिळाली आहेत, तीन वेळेला शिक्षण मंडळ पि चि म न पा कडून आदर्श शाळा म्हणून गोरविण्यात आले. तसेच आभ्यास नाट्य स्पर्धा गेल्या पाच वर्षापासून प्रथम क्रमाक मिळत आहे, पुणे जिल्हा परिषद आंतर शालेय नाट्य स्पर्धेत दोन वर्षापासून तालुका स्तरावर प्रथम व जिल्हा स्तरावर उतेजनार्थ बक्षीस मिळाले आहे, याशिवाय सकाळ देनिक नाट्य स्पर्धा. भालभा केळकर आंतर शालेय नाट्य स्पर्धा, ईको फोक्स आंतरशालेय नाट्य स्पर्धा, कलापिनी बालनाट्य स्पर्धा, अखिल भारतीय बालनाट्य आंतर शालेय नाट्य स्पर्धा, महाराष्ट्र बालशिक्षण परिषद, अशा स्पर्धा मध्ये शाळेला बक्षीस मिळाले आहे, दरवर्षी राज्य नाट्य स्पर्धामध्ये भाग घेतला जातो, शिवाय राज्यस्तरीय चित्रकला व ह्स्ताक्षर स्पर्धा मध्ये शाळेला आदर्श शाळा पुरस्कार मिळाले आहेत, विद्यालय विद्यार्थीसाठी, शालेय अभ्यासक्रम बरोबरच क्रीडा स्पर्धा. स्नेहसंमेलन, पालक मेळावा पालक क्रिडा स्पर्धा हि घेतल्या जातात.

शाळेतील प्रत्येक विद्यार्थी हा गुणवत्तापूर्ण शिकला व ठिकला पाहिजे यासाठी जादा तास व इतर शेक्षणिक उपक्रमराबविले जातात, यामुळे शाळेची विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याकरिता संस्थेच्या वतीने बालवाडी व प्राथमिक विभागासाठी ई लर्निग सुविधांचा तसेच संगणक शिक्षण विद्यार्थांना दिले जाते, दररोजच्या अभ्यास लिहण्यासाठी डायरी दिली जाते.

शाळेत विविध समित्या मार्फत विविधशालेय उपक्रमा बरोबरच १००/ उपथिती. नाट्यस्पर्धा. टी म वी गणित स्पर्धा. रंगभरण स्पर्धा. ह्स्तक्षर स्पर्धा. वकृत्व स्पर्धा. प्रश्नमंजुषा स्पर्धा. निबंध स्पर्धा. प्रकल्प स्पर्धा. गीतापठण स्पर्धा. भजन स्पर्धा. स्लोक पाठांतर स्पर्धा. अभिनय स्पर्धा. अशा विविध स्पर्धा. वर्षभरात शालेय अभ्यास बरोबर घेतल्या जातात.व विद्यार्थी बक्षिसे मिळवतात.

संस्थेच्या वतीने अद्यावत वर्ग खोल्यांमध्ये सी सी टी व्ही नियत्रनात इमारत आहे. शुध्द पाण्याची व्यवस्था असून याठिकाणी मुलांच्या आरोग्या बरोबरच त्यांच्या गुणवत्तेची काळजी घेणारी म्हणजे आमची शाळा भारतीय जैन संघटना संचलित प्राथमिक विद्यालय संत तुकाराम नगर पिंपरी पुणे.१८

मुख्याध्यापक
श्री संजय जाधव
( एम. ए. डीएड. बी.एड. )